रोहित पवार, जयंत पाटलांमुळे भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, ओबीसी नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निकालानंतर तीन आठवड्यांनी अखेर रविवारी (१५ डिसेंबर) महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. एकूण ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळात महायुतीनं एकूण १८ नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
मात्र तिन्ही पक्षांकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं आहे. त्यांना मंत्रीपद दिलं नाही. मंत्रीमंडळातून डच्चू मिळालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे.
भुजबळांना मंत्रीपद नाकारल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक होताना दिसत आहे. भुजबळांना डावलल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट आतून एकच आहेत. भविष्यात रोहित पवार आणि जयंत पाटलांना मंत्रीमंडळात घ्यायचं असावं, यामुळेच भुजबळांना मंत्रीमंडळातून वगळल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. हाके यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भुजबळांना मंत्रीमंडळातून वगळण्यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांना आपले पुतणे रोहित पवार आणि जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं, म्हणूनच कदाचित त्यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं असावं, असा गंभीर लक्ष्मण हाके यांनी केला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, महायुती सरकारने छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावं, असं हाके यांनी म्हटलं आहे.
या बड्या नेत्यांना महायुतीने दिला नारळ
भाजपनं सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित यासारख्या मोठ्या नेत्यांना घरी बसवलं आहे. तर शिवसेना शिंदे गटानं दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना डच्चू दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळांसोबत दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..