झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल निधन झालं. आता संगीत क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे.
एका धक्क्यातून सावरत असताना संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला.
संगीत भुषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक व हार्मोनियम ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
68 व्या वर्षी गायक पंडित संजय राम मराठे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात युवा तडफदार गायक भाग्गेश मराठे, प्राजक्ता मराठे, पत्नी, सूना नातवंडे असा परिवार आहे.
संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नुकत्याच जन्मशताब्दी निमित्त वर्षभर अनेक कार्यक्रमात त्यांचा मुख्य सहभाग होता. आपले धाकटे बंधू गायक मुकुंद मराठे यांच्यासह त्यांनी संगीत मंदारमाला हे संगीत नाटक जन्मशताब्दी वर्षात साकारले होते आणि आज देखील त्याचे प्रयोग जोरदार चालू आहेत. त्यांचे अंत्यविधी सोमवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जवाहर बाग स्मशानभूमीत होणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..