परभणीत तरुणाच्या मृत्यूनंतर ‘महाराष्ट्र बंद’ला अंबादास दानवेंचा पाठिंबा म्हणाले, ‘SP- जिल्हाधिकाऱ्यांना निलंबीत करा’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “परभणी जिल्ह्यात झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. परभणीच्या या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संशयाचे वातावरण तयार झाले असून आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दर्शवलाय. या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केलीये. या प्रकरणामुळे परभणीत वातावरण तापण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. याबाबत अंबादास दानवे म्हणाले, दलित संघटना उद्या बंद पुकारात आहेत. त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत. यासंदर्भात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली. बैठकीत निर्णय झाल्याचं ते म्हणाले.
नक्की प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या हिंसाचाराच्या आणि दगडफेकीच्या घटनेत 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यात 35 वर्षे एका तरुणाचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला आहे. छातीत कळ आल्याने या तरुणास दवाखान्यात नेण्यात आले, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला, सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून त्याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेला उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीचे IG शहाजी उमाप यांनी परभणीकरांना शांतता राखण्याचा आवाहन केलंय. या प्रकरणाने राजकीय घटनांना वेग आला आहे. परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्र बंदमागे या मागण्या
परभणीत झालेल्या घटनेनंतर 16 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे व्हावेत, अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, शाहिद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, या मागण्या सरकारसमोर केल्या जाणार आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..