भाजपचा विरोध तरीही संधी; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ खास शिलेदारांना मंत्रिमंडळात स्थान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता महायुतीचेही सरकार स्थापन झाले आहे. रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी नवीन मंत्र्यांना शपथ दिली आहे.
नागपुरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महायुती सरकारच्या या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंच्या खास शिलेदारांनी शपथ घेतली आहे.याआधी 1991 मध्येही नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता.
शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
दरम्यान संजय राठोड यांच्या मंत्रिपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध होता. मात्र अशातच आज त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच या नावाबाबत चर्चा होत आहेत. आता संजय राठोड यांनी नेमकी भाजपची कशी मनधरणी केली? हा सवाल इथे उपस्थित झाला आहे.
रविवारी फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. याआधी अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा रविवारी नागपुरात विस्तार करण्यात आला. या काळात ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. आज रात्रीपर्यंत खात्यांची यादीही जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..