महाजॉब जाहिरातीवरून काँग्रेसचे राजीव सातव सह सत्यजीत तांबे यांची नाराजी तर शिवसेनेची दिलगिरी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाजाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ? असा प्रश्न युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. त्यामुळे महाजाॅब्स् योजनेवरून महाविकास आघाडीत राजकारण सुरु झालं आहे. याबाबत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त केल्याचे देखील वृत्त आहे.
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, असे सत्यजीत तांबे म्हणाले.
महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने सत्यजीत तांबे व खासदार राजीव सातव यांनी उघड नाराजी व्यक्त केलीदरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेनं दिलगिरी व्यक्त केल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजीत यांनी ट्वीट केले असेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.