पुन्हा असं करशील का..?, आंबेडकरी अनुयायांनी परभणी घटनेतील माथेफिरुला विचारला जाब, प्रतिमेसमोर नतमस्तक..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेमुळे परभणीमध्ये हिंसाचार घडला. एका माथेफिरुने केलेल्या या विटंबनामुळे गेली दोन दिवस येथील परिस्थिती तणावग्रस्त झाली होती.
तर आता आंबेडकर अनुयायांनी या माथेफिरूला चोप दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडले. रुग्णालयात दाखल असलेल्या त्या व्यक्तीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संविधानाच्या प्रतिकामात्मक प्रतीची विटंबना करणारा आरोपी सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. उपचार सुरू असताना परभणी शहरातील काही आंबेडकर अनुयायांनी दवाखान्यात जाऊन त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर या आरोपीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे समोर आले आहे.
व्हायरल व्हिडिओत काय दिसून येतेय?
हॉस्पिटलमधील या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भीमसैनिक या आरोपीला समजाऊन सांगताना दिसत आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून माफी मागत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचे दिसते.
परभणी हिंसाचारात 350 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल
परभणी येथे झालेल्या हिंसाचारात जवळपास 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 41 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. तसेच शहरातील 10 सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेड परीक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितले आहे.
या घटनेने संपूर्ण घटनेमुळे परभणीतील अनेक व्यापाऱ्यांचे व निवासाी वसाहतीतील लोकांचे नुकसान झालेले आहे. अनेकांच्या घराबाहेरील गाड्या फोडण्यात आल्या. तर व्यापारी संकुलांचे नुकसान करण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते.
10 डिसेंबरला काय घडली होती घटना?
दरम्यान, परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात चांगलेच वातावरण तापले होते. जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी तसेच भीमसैनिकांनी घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढला होता. तसेच अनेक ठिकाणी हिंसा देखील घडली, माथेफिरू आरोपीला देखील भीमसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..