संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार का..? चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुती सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. पण अजूनही मंत्रिमंडळाच्या विस्तार रखडेला आहे. सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
त्याआधी खातेवाटप होण्याची शक्यता आहे. पण अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या मंत्रिबद्दल मोठं भाष्य केलं आहे.
भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या नावाला कडाडून विरोध केला होता. आता महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा संजय राठोड यांना संधी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण चित्रा वाघ यांनी आपला लढा कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिलेली होती म्हणून एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं त्यामुळे त्यांना मागील सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण माझी लढाई अजून संपलेली नाही. यावेळेस काय होते हे पाहू, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“उद्धव ठाकरे हनुमान मंदिर हटवण्याबद्दल आरोप केला आहे. पण त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. काँग्रेसच्या मांडीला ते जाऊन बसले आहेत. त्यांना ते मंदिर गणपतीचं आहे की हनुमानाचं आहे हे माहिती नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही वाघ यांनी लगावला.
“लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही. ही गरळ संजय राऊत यांनी ओकली आहे, त्यांना ही योजना नको आहे. त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते पराभवचं खापर हे EVM मशीनव र
फोडत आहे, अशी टीकाही वाघ यांनी केली.
“सुनंदा पवार या काय राजकीय व्यक्ती नाहीत त्या सामाजिक काम करत असतात. त्या कोणत्या उद्देशाने बोलल्या या माहिती नाहीत. मंत्रिमंडळात लाडक्या बहिणी पाहायला मिळतील, असंही वाघ म्हणाल्या.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..