देशात अन् महाराष्ट्रात देखील पुष्पा, महाराष्ट्राचे पुष्पा 2 हे कोण हे सांगायचे गरज ; विजय वडेट्टीवारांचा मिश्किल टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात महायुती सरकारची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाच्या कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आपापल्या कामाला लागले आहेत.
अशातच मंगळवारी मुंबईत एक महत्त्वाची घडामोड घडली. उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका करत या भेटी विषयी भाष्य केलंय. देशातील सरकारचा आणि महाराष्ट्रातील पुष्पा 2 ची ही भेट आहे. महाराष्ट्राचा पुष्पां 2 कोण हे सांगायचे गरज नाही. असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप आणि गौतम अदानी यांच्या कनेक्शनवरुन टीकेची झोड उठवली होती. विशेषत: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील कथित साटेलोटे असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. याशिवाय, अनेक मुद्यांवरुन भाजप आणि गौतम अदानी यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान मंगळवारी झालेल्या भेटीवरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.
मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते पद द्यायला तयार असतील तर मग आम्ही….
महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती पुढे आली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केली जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचं बोलणं झालेलं आहे. या अधिवेशनात आमची एकत्र बैठक घेऊ आणि चर्चा करू, विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजप तयार आहे का? त्यांची तयारी आहे का ? हे पाहिले त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ असेही ते म्हणाले. आम्ही पहिलेच नाव देणार नाही, त्यापेक्षा त्यांना विचारून मुख्यमंत्री विरोधीपक्ष नेते द्यायला तयार असतील तर मग आम्ही नाव देऊ असेही ते म्हणाले.
शिंदे अन् अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दोघांनाही दिल्लीच्या हाय कमांडवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हलणार नाही, वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना तो मिळवावे लागेल,अशी बोचरी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. ईव्हीएमचा घोळ आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतात एकमेव आपला देश आहे ज्यात ईव्हीएम वर निवडणूक होतात. सगळे देश ईव्हीएम वर निवडणूक घेत नाहीत. जगाने ज्या गोष्टी नाकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणूक बॅलेटवर निवाडणूक झाल्या पाहिजे, बॅलेटपेपर हा अंतिम निर्णय आहे. त्यासाठी कोर्टात आम्ही दाद मागण्याची तयारी करतोय असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….