राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव , एवढ्या खासदारांचा पाठिंबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या ७० खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
इंडिया ब्लॉकमध्ये सामील असलेल्या समाजवादी पक्ष (सपा) आणि तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) देखील या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या पक्षांनी निदर्शनात भाग घेतलेला नाही.
इतका पक्षपाती सभापती कधी पाहिला नाही
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, विरोधकांनी ऑगस्ट महिन्यातच २० सदस्यांच्या सह्या गोळा केल्या होत्या. मात्र, त्यांनी धनखड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. संसदेबाहेर काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह म्हणाले, “मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही.”
केंद्र सरकारवर सभागृह कमकुवत केल्याचा आरोप
केंद्र सरकार अदानींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी केंद्र सरकारवर सभागृह कमकुवत केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “प्रश्नोत्तराच्या तासात सरकारचे खासदार उभे राहत असून चर्चेला थांबवतात. माझा प्रश्न यादीत होता, पण मला प्रश्न विचारू दिला गेला नाही.” त्यांनी पुढे आरोप केला की, “अदानींच्या भ्रष्टाचारात भाजप सरकार सहभागी आहे. त्यामुळे अदानी यांचे नाव पुढे येऊ नये यासाठी सभागृहाचे कामकाज विस्कळीत केले जात आहे.”
काँग्रेसला मिळालेल्या विदेशी निधीवर चर्चा करण्याची मागणी
काँग्रेसच्या विदेशी निधीवर भाजपचा आरोप शून्य प्रहरात भाजप खासदारांनी काँग्रेसला मिळालेल्या विदेशी निधीवर चर्चा करण्याची मागणी केली. राज्यसभेतील भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया-पॅसिफिक (FDL-AP) आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी असा दावा केला की, “या फोरमला जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचे उद्दिष्ट आहे, आणि त्याला राजीव गांधी फाउंडेशनकडून आर्थिक मदत मिळते.”
काँग्रेसने मात्र या आरोपांना नाकारले असून असे म्हटले आहे की, भाजप अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्यांनी सभापती धनखड यांच्यावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….