‘नदीजोड’, हरित ऊर्जेला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला पाच वर्षांचा आराखडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पुढील पाच वर्षांत राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.
फडणवीस म्हणाले, ”मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात आमचे सरकार आले. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झालो. या काळात आम्ही अनेक योजना सुरू केल्या असून त्या आता वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पुढील काळात नदीजोड प्रकल्प अधिक गतिमान करण्यावर माझा भर असणार आहे. पाटबंधारे मंत्री म्हणून, मी चार नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.” महाराष्ट्र राज्य दुष्काळापासून मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हरित ऊर्जेवरदेखील (ग्रीन एनर्जी) भर दिला जाणार असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, २०३० पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश वीज ही हरित ऊर्जा राहील. शेती आणि उद्योगाला त्याचा अधिक फायदा होणार आहे. असे झाले तर रोजगाराचीही निर्मिती होऊन अर्थकारणाला देखील चालना मिळेल.
फडणवीस म्हणाले, की मुंबईच्या ‘एमएमआर’ परिसरातील कोणत्याही भागात एक तासात जाता आले पाहिजे, अशी घोषणा मी २०१६ केली होती. आम्ही त्याच्यापुढे आता सागरी मार्ग (कोस्टल रोड) पूर्ण केला. वर्सोवा-मढची निविदा काढली असून ते कामही सुरू होईल. मढपासून विरारपर्यंत ‘सी लिंक’ तयार करण्यात आली आहे. जपान सरकारने त्यासाठी ४० हजार कोटी रुपये देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मुंबईची वाहतूक कमी होणार असून सुमारे ३७५ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळ्याची यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्य तिथे राज ठाकरेंची मदत घेणार
राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा नक्कीच फायदा झाला. विधानसभेला आमचे तीन पक्ष असल्याने त्यांना जागा देता आली नाही. राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्याबरोबर ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे त्याठिकाणी त्यांच्याशी युती करू, असेही त्यांनी सांगितले.
‘स्थानिक स्वराज्य निवडणूक होणार’
मागील अडीच ते तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. याबाबत फडणवीस म्हणाले, की महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात कालच प्रकरणातील वकिलांशी चर्चा केली. या याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी विनंती अर्ज सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका लवकर होतील असे अपेक्षा आता व्यक्त होऊ लागले आहे.
राहुल गांधींनी आत्मचिंतन करावे
”निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक’ईव्हीएम’वर चर्चा करत आहेत. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली. झारखंडमध्ये विजयी झाल्यानंतर ‘ईव्हीएम’ चांगले तर महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर शंका, हे योग्य नाही. लातूरमध्ये एक देशमुख विजयी झाले तर दुसरे पराभूत झाले. पराभूत झालेल्या जागेबाबत ‘ईव्हीएम’वर शंका घेतली जाते. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘ईव्हीएम’ वर बोलण्यापेक्षा आत्मचिंतन करावे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत…
धारावी प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधी यांच्या काळात मांडली होती. मात्र कुठल्याच सरकारने काहीच केले नाही
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या प्रकल्पाचा ‘डीपीआर’ करून रेल्वेची जागा विकत घेतली
प्रकल्पाची निविदा काढून विकासक नेमला
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी निविदा रद्द करीत नव्याने नियम तयार केले
आताच्या निविदेतील सर्व उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारने तयार केलेले आहेत तेच आहेत
या योजनेत २०११ पर्यंतच्या पात्र लाभार्थींना धारावीतच घर देणार
पण जे लोक नियमात बसत नाहीत, त्यांच्यासाठी भाडेतत्वावर घर देण्याची व्यवस्था
भाडेतत्त्वावरील घरात ११-१२ वर्षे राहिल्यानंतर थोडे पैसे भरून नावावर घर करता येईल

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….