“कोण विरोधक..? त्यांनी आम्हाला.”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत..? आमदारकीची शपथही घेतली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाविकास आघाडीने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला आहे. आज त्यांच्यापैकी कुणीही शपथ घेणार नाही. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे.
कोण विरोधक? ज्यांनी आम्हाला जागा वाटपात विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही गोष्टींची चर्चा केली नाही ते का? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. तसंच त्यांनी शपथही घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी मविआतून बाहेर पडण्याचेच संकेत दिले आहेत.
अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
सपाचे अबू आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
काय म्हणाले अबू आझमी?
कोण विरोधक? त्यांनी आमच्याशी निवडणुकीच्या दरम्यान संपर्क साधला नाही. तिकिट वाटपात आमच्याशी बोलणी केली नाही. मग आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काय? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. ईव्हीएमबाबत जर लोकांना संशय असेल तर ते हटवलं गेलं पाहिजे. त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार सगळ्यांना एकत्र येऊन याचा विरोध किंवा निषेध करायला हवा. उद्धव ठाकरे तर म्हणत होते की मी सेक्युलर झालो आहे. समाजवादी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली होती. आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी आठवल्या का? असा खोचक प्रश्न अबू आझमींनी ( Abu Azmi ) विचारला आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी चालणार नाही असं झालं तर. असंही अबू आझमी ( Abu Azmi ) म्हणाले.
शिवसेनेसारख्या पक्षाबाबत सपा राहू शकत नाही-अबू आझमी
उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षाबरोबर समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी मविआसोबत राहीन, असे वाटत नाही. समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षासोबत कसे राहणार? असा प्रश्न अबू आझमींनी विचारला आहे. मविआच्या सगळ्या आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबु आझमी यांनी मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली. त्यामुळे अबू आझमी मविआची साथ सोडतील अशा चर्चा आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….