ढाणकी येथे देशी दारू जप्त ;बिटरगांव पोलीस स्टेशनची कारवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे 9970535988
ढाणकी
सध्या कोरोनामुळे संपूर्ण राज्यात जमावबंदी तसेच काही भागात संचारबंदी लागू आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अश्याही स्थितीत अवैध धंद्यात वाढ झाली असून दारूची तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे.
ढाणकी येथे कोरोनाचे 7 व्यक्ती पॉसिटीव्ह आढळण्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये हे टेंभेश्वर नगर येथे असताना दोन इसम मोटारसायकल वरून भरधाव येताना संशयास्पद आढळले. सदर व्यक्तींना अडवून चौकशी केली असता गाडी चालवणारा अनिल सदाशिव चटलेवाड वय 23 वर्ष हा गाडी चालवत होता तर मागे बसलेला व्यक्ती राजेश बाबुलाल भंडारे वय 23 वर्ष हा पांढऱ्या पोत्यात काही तरी घेऊन बसलेला आढळला. पोत्याची पाहणी केली असता पोत्यात देशी दारू भिंगरी च्या 90 मिली च्या 120 बॉटल प्रत्येक बॉटल 26 रुपये असा एकूण 3120 रुपये चा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून मोटारसायकल, जिओ कंपनीचा मोबाईल असा असा सर्व मुद्देमाल एकूण किंमत 19120 रुपये जप्त करण्यात आला असून त्या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कार्यवाही बिटरगाव पोलीस स्टेशनं चे ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोलीस शिपाई मोहसीन खान , संदीप राठोड गजानन खरात , भालेराव यांनी केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..