राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह ; राज्यपाल झाले क्वारंटाइन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाने कहर केला आहे. राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता.त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..