शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला. दरम्यान, स्वतः शरद पवार यांनी खाली उतरून जखमींची विचारपूस केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने शरद पवार निघाले होते. तेव्हा, पाठीमागील पोलीस व्हॅन (MH- 12 NU- 5881) ही अचानक उलटली. यामुळे यातील वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले. दरम्यान, अपघात झाल्याने शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे. लोणावळा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..