धक्कादायक! अकोला कारागृहातील तब्बल ५० कैद्यांना कोरोनाची लागण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अश्यातच आता अकोल्यातील जिल्हा कारागृहाच्या ५० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
शिवाय इतर २८ लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अकोल्यात काल दिवसभरात ७८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत.
दरम्यान याआधी देखील १८ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात सध्याच्या घडीला ३०० कैदी आहेत.
कोरोनाच्या काळात कोणत्याही नव्या कैद्याला कारागृहात आणण्यात आलेले नाही. सरकारी मेडीकल कॉलेज आणि रूग्णालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी सकाळी ७८ लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..