उमरखेड चे सुफिसंत डोंगरेपीर बाबाचा संदल उत्साहात साजरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- उमरखेड शहराला सुफी संतांची भूमी म्हणुन ओळख आहे. उमरखेड च्या अनेक भागात सुफी संतांची समाधी स्थिरावली आहे. दरम्यान, काल बकरीद ईदनिमित्त डोंगर पीर बाबाचा उर्स दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा झाला. उमरखेड शहरातील गांधी चौकातून व शहरातील अनेक मार्गातुन मार्गक्रमण करत या संदल मिरवणुकीचा समारोप डोंगरेपीर बाबा यांच्या दरगाह वर करण्यात आला.
या संदल मिरवणुकीत डोंगर पीर बाबांचे शेकडो चाहते सहभागी झाले होते, दरम्यान, संदलमध्ये आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे आभार मुजावर सय्यद वसीम सय्यद इसाक , माजी नगरसेवक सय्यद असफर, शाहरूख पठाण, ताहेर मिर्झा, जमीर खतीब यांनी मानले.
या संदल मिरवणुकीत उमरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर सै.आवेस,सै.सरफराज, सै.मोसिन,सै.अमन, सै.ईमरान,सै.असलम
सै.वसिम आदींनी परिश्रम घेतले
“दरवर्षी निघणाऱ्या संदल पेक्षा यावेळी आम्ही DJ मुक्त करून सामजिक संदेश दिला.. पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले ”
सय्यद अफसर
शहराध्यक्ष
एम आय एम पार्टी
उमरखेड…

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….