धनंजय मुंडेची कोरोनावर मात, मिळाला डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मागील अकरा दिवसांपासून मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेत असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर परळी आणि बीडमधील त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले
धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे१२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी कोरोनावर मात केली असून आज ते आपल्या घरी परततील. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे महाविकासआघाडी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना लागण झाली होती. या दोन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.
धनंजय मुंडे मुंबईत आल्यानंतर त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे रिपोर्ट १२ रात्री मिळाले. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या संबंधीत पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये कोणाला कोरोनाची लक्षणे दिसून आली नव्हती. ते सर्व एसिम्टोमॅटीक असल्याचे सुरूवातीला लक्षात आले होते.