महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य ; विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये तीव्र संताप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकसंथ आणि ताकदीने दिसेल, अशी चर्चा होत असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे.
उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती
विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेचे परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. महाविकास आघाडी असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी अगोदर चर्चा करायला हवी होती, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, लोकसभा जागावाटपाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या चार जागांसाठी गेल्या महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी 15 जूनला मतदान होणार होते, पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती.
7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली. त्यानंतर नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार आता 26 जूनला मतदान होईल. मतमोजणी 1 जुलैला करण्यात येणार आहे. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
निवृत्त होणारे सदस्य
मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना ठाकरे गट)
मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती)
कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप)
नाशिक शिक्षक : किशोर दराडे (अपक्ष)

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..