मोदी कॅबिनेटचा दुसरा धडाकेबाज निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पीएम आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी कॅबिनेटची पहिली बैठक सध्या नवी दिल्ली येथे सुरू असून पीएम हाऊसमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.
या कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. PM आवास योजनेतंर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. ही घरे शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार आहेत.
बांधण्यात येणाऱ्या या घरांमध्ये एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शनदेखील असणार आहे. यापूर्वी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, गेल्या 10 वर्षांत पात्र गरीब कुटुंबांसाठी सुमारे 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या निर्णयापूर्वी मोदींनी आज पदाभार स्वीकारल्यानंतर सकाळी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करून तिसऱ्या टर्मचा पहिला निर्णय घेतला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..