रामोजी फिल्म सिटी चे संस्थापक रामोजी राव यांचे दुःखद निधन ; 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- माध्यम आणि चित्रपट जगताचे सम्राट रामोजी राव यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. भव्य आणि प्रसिद्ध अशा रामोजी फिल्म सिटीचे ते संस्थापक होते. शिवाय माध्यम संस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे.
पीएम मोदींनीही रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘श्री रामोजी राव गरू यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली आहे. आपल्या उल्लेखनीय प्रयत्नांनी, त्यांनी मीडिया आणि मनोरंजनाच्या जगात नाविन्य आणि उत्कृष्टतेचे नवीन मानक स्थापित केले.
रामोजी फिल्म सिटी हैदराबादची स्थापना 1996 मध्ये रामोजी राव यांनी केली होती, त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी झाला होता. रामोजी फिल्म सिटी हा जगातील सर्वात मोठा फिल्म शूटिंग स्टुडिओ मानला जातो. हे भारताच्या तेलंगणा राज्यात आहे. हा स्टुडिओ एकूण 1666 एकर परिसरात पसरलेला आहे.
रामोजी स्टुडिओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच वेळी 15 ते 25 चित्रपटांचे चित्रीकरण केले जाऊ शकते. येथे एकूण 50 शूटिंग फ्लोअर्स आहेत. आतापर्यंत या स्टुडिओमध्ये एकूण 25000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ व्यतिरिक्त ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘सूर्यवंश’, ‘दिलवाले’, ‘नायक’, ‘गोलमाल’ यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंगही झाले. याशिवाय अनेक मालिकाही येथे शूट झाल्या आहेत.रामोजी राव यांचे मीडिया आणि भारतीय चित्रपट उद्योगातील योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सध्या संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..