राहुल गांधी विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का..? ; आज होणार फैसला…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं.
त्यामुळे रविवारी ९ जून रोजी नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. आज दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. काँग्रेस अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे खासदार राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंददर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षांचं नेतृत्व करणार का? हे आज स्पष्ट होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..