यवतमाळ वाशिमच्या आमदारानी नैतिकता स्विकारुन राजीनामे द्यावे :- राजू दुधे ची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील मतदार संघात महायुतीचे 7 आमदार असुन महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमदेवार संजय देशमुख हे एक लाख मताधिक्याने विजय प्रात करतात. ही बाब महायुतीसाठी लाजीरवानी आहे. या सर्वच आमदारांनी नैतिकता स्विकारुन आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत असे मत राजु दुधे यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे व्यक्त केले.
राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात यवतमाळ वाशिम मतदार संघातील पुसदचे आमदार इंद्रनिल नाईक हे मतदारांचा कोणताही विचार न करता स्वहीतासाठी अजितदादा गटात गेले. महायुतीच्या उमेदवाराला 40 हजाराचे मताधिक्य मिळवुन देण्याच्या गप्पा भर सभेत केल्या. तर येथील दुसरे आमदार निलय नाईक यांनीही विक्रमी मताधिक्याने राजेश्रीताईला निवडून आणु असे अनेकवेळा निवडणुक दरम्यान बोलुन दाखविले. पुसद मतदार संघात दोन आमदार असतांना महायुतीच्या उमेदवाराला केवळ 3 हजाराचे मताधिक्य मिळते. या वरुन यांची निष्क्रीयता सिध्द होते.
तर दिग्रस मतदार संघाचे आमदार तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे स्वहितासाठी ठाकरेना सोडून शिंदे गटात गेले. यांनी तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विक्रीम मताधिक्य देऊन निवडूनच आणणार अशा आशयावर ताईंना उमेदवारी मिळवुन दिली परंतु स्वत:च्या मतदार संघात 9 हजाराचे मताधिक्य देशमुख यांना मिळाले. यावरुन सामान्य मतदारांना व शिवसैनिकांना संजय राठोड यांचे ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणे, मतदारांना पचणी पडले नाही. हे यावरुन सिध्द होते. यवतमाळ मध्ये मदन येरावार यांच्या मतदार संघात 2500 मताधिक्य देशमुख यांना अधिक मिळाले.
शिवाय आमदार उईके यांच्या राळेगाव मतदार संघात देशमुख यांना 24677 मताधिक्य मिळाले. तसेच कारंजा मतदार संघात 20962 आणि वाशिम मतदार संघात 39739 मताधिक्य देशमुख यांना मिळाले. या एकंदर परिस्थिती भाजपाचे 5, शिंदे गटाचे 1 आणि अजितदादा गटाचा 1 असे आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीचे डॅा. वजाहत मिर्झा हे एकमेव आमदार आहेत. ही निवडणुक शिवसेना उ.बा.ठा. गट, राष्ट्रीय कॅाग्रेस, मुळ राष्ट्रीवादी शरद पवार गट सामान्य शिवसैनिक व कार्यकर्तानी किल्ला लढविला गेला तरी सुध्दा मोठ्या फरकांनी संजय देशमुख यांना विजय प्राप्त झाला.
उलट महायुतीकडे 7 आमदार आणि मोठी फळी असतांना राजश्री पाटील यांचा पराभव होणे यांची नैतिक जबाबदारी स्विकारुन आमदारांनी राजीनामे द्यावेत असे माजी पाणी पुरवठा सभापती राजु दुधे यांनी प्रसिध्द पत्रकातुन मागणी केली.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….