मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघालेल्या नवनिर्वाचित खासदार यांच्या गाडीचा अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- बीड लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजयी ठरलेले बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती येत आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना हा अपघात झाला.
अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याचं सांगितलं जातंय.
बीड लोकसभेत विजय झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील एक गाडी बजरंग सोनवणेंच्या गाडीला धडकली. त्यामुळे झालेल्या अपघातात काहीजण जखमी झाले आहेत.
रात्री उशिरा धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कुणीही गंभीर जखमी नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला आहे. सोनवणे यांना ६ लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली. तर पंकजा मुंडे यांना ६ लाख ७७ हजार ३९७ मतं मिळाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये आणि शेवटपर्यंत काय होईल काय नाही, अशा परिस्थितीत बजरंग सोनवणेंचा विजय झाला आहे.
बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालल्याचं बोललं जात आहे. बजरंग सोनवणे यांनीही ते कबुल केलं आहे. त्यामुळे खासदार सोनवणे हे जरांगेंच्या भेटीसाठी निघाले होते. त्यातच त्यांच्या ताफ्याला अपघात झाला. परंतु सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….