सुरुवातीच्या निकालात ओवेसी आघाडीवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- हैदराबाद लोकसभेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. येथे असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपने हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांना उमेदवारी दिली होती.
त्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून सातत्याने चर्चेत असतात. यातच हैदराबाद सारख्या जागेवर भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे. हैदराबाद लोकसभा हा ओवेसी यांचा गड मानला जातो. गेल्या १९८४ पासून ही जागा ओवेसी कुटुंबाच्या त्याब्यात आहे. गेल्या १३ मे सोजी हैदराबद लोकसभेसाठी मतदान झाले होते. आज मत मोजणी होत आहे.
येथे सर्व प्रथम झालेल्या पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीनंतर, आलेल्या सुरुवातीच्या निकालात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत. तर माधवीलता पिछाडीवर आहेत. ओवेसी हे गेल्या 2004 पासून सलग चार वेळा हैदराबादचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर आता पाचव्यांदा पुन्हा एकदा मैदानात आहेत. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत राहतात.
माधवी लता यांनी 2018 मध्ये भाजपच्या सहाय्याने पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेलवे होते. यानंतर त्यांनी 2019 मध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यात त्यांचा मोठा पराभव झाला होता. माधवी लता या एक भरतनाट्यम डान्सरही आहेत. तसेच, त्या एक रुग्णालयाच्या चेयरपर्सन देखील आहेत. त्यांनी त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केले आहेत.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….