“ठाकरे-शिंदे” ‘या’ मतदार संघात “आमने-सामने”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तसेच शिंदे गटानेही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट कुठल्या मतदार संघात थेट लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुठल्या पक्षाचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत वरचढ ठरणार असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. शिंदे गटाच्या यादी वाचल्यास असे लक्षात येते की,
ज्यामध्ये त्यांनी पहिले आठ उमेदवार जाहीर केले आहे. यापैकी सात जागांवरचे उमेदवार हे विद्यमान खासदारच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी पहिली यादी जारी करताना कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आत शिंदे गटाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ते ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराशी भिडणार हे आता समोर आलं आहे. तर ठाकरे गटाकडूनही मुंबईत तब्बल 4 मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केलेले असताना शिंदेंच्या शिवसेनेने केवळ मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघातील उमेदवारच जाहीर केला आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी?
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर.
शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी?
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
या पाच मतदारसंघात दोन्ही शिवसेना हे थेट आमनेसामने असणार आहे. अशावेळी या मतदारसंघामधून नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
1. मुंबई दक्षिण-मध्य: अनिल देसाई (ठाकरे गट) vs राहुल शेवाळे (शिंदे गट)
2. शिर्डी: भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) vs सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
3.मावळ: संजोग वाघेरे (ठाकरे गट) vs श्रीरंग बारणे (शिंदे गट)
4.बुलढाणा: नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) vs प्रतापराव जाधव (शिंदे गट)
5. हिंगोली: नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) vs हेमंत पाटील (शिंदे गट)

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….