“मी चंद्रकांत खैरेंच काम करणार नाही” ; अंबादास दानवे यांचे खळबळ जनक वक्तव्य…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकूण 17 उमेदवारांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा करण्यात आली आहे.
तर, चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे” असे दानवे म्हणाले आहेत. यावरून खैरे आणि दानवे यांचा वाद अजूनही संपला नसल्याचे स्पष्ट होते.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज खैरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावर बोलतांना दानवे म्हणाले की, “सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. पक्षप्रमुख जी काही बाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार असल्याचे देखील दानवे म्हणाले.
आत्ताच पक्ष प्रमुखांना फोन करून बोललो : दानवे
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, “मी इच्छुक होतो, 2014,2 019 आणि आताही इच्छा होती. इच्छा असणे वावग नाहीं. मात्र, मला विरोधी पक्षनेते पद महत्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुखाचा आहे. व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. मी पक्ष प्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू असे त्यांना सांगितले आहे. इच्छा असतांना उमेदवारी मिळाली नसल्याने थोडफार वाईट वाटत असते. पण, जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती पूर्ण करेल, “असे दानवे म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..