ठाकरेंची शिवसेनेची उद्या उमेदवारांची घोषणा होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला जागावाटपावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. मविआमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 26 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.
तशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो. याच उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे
शिवसेनेच्या (ठाकरे गट) पहिल्या यादीत कोणत्या मतदारसंघांचा समावेश?
शिवसेना आपल्या पहिल्या यादीत कोणताही वाद नसणाऱ्या मतदारसंघांवर उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या जागांचा समावेश असू शकतो. यासह वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरही शिवसेना आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते.
महाविकास आघाडीची आज निर्णायक बैठक
दुसरीकडे महाविकास आघाडीची आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. शिवसेनेने उद्या (26 मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी केलेली असताना या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना सांगली जिल्ह्यातही आपला उमेदवार जाहीर करू शकते. या जागेवर काँग्रेसनेही दावा केलेला आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त जागांवरही या बैठकीत ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
3. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
4. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
5. रायगड – आनंद गीते
6. रत्नागिरीसिंधुदुर्ग- विनायक राऊत
7. ठाणे- राजन विचारे
8. धाराशिव- ओमराजे निंबाळकर
9. परभणी -संजय जाधव
10. सांगली – चंद्रहार पाटील
11. मावळ- संजोग वाघेरे
12. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
13. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15.छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
16. यवतमाळ वाशिम संजय देशमुख

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..