लेकीसाठी विजय वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली , पण बाजी मारली प्रतिभा धानोरकरांनी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून अनेक घडामोडी घडत आहेत. अशात महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून देखील रस्सीखेच पाहायला मिळाली.
शेवटी दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवारांची (Vijay Wadettiwar) कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) देखील इच्छुक होत्या. तर, लेकीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. थेट दिल्ली वारी करून त्यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. पण शेवटी उमेदवारी मिळवण्यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची लाज राखणारा म्हणजेच एकमेव उमेदवार निवडून आलेला मतदारसंघ म्हणून चंद्रपूर मतदारसंघ ठरला होता. मात्र, खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यावर या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. याचवेळी शिवानी वडेट्टीवार यांनी देखील तयारी सुरु केली. विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली सुरु होताच, प्रतिभा धानोरकर देखील थेट दिल्लीत पोहचल्या. दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन त्यांनी आपली बाजू मांडली. शेवटी रविवारी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
एका लेकीला उमेदवारी दुसरी लेकीला डावललं….
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दोन लेकी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. ज्यात सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे आणि विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी वडेट्टीवारांचा समावेश होता. प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तर शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, प्रणिती यांना उमेदवारी जाहीर झाली असून, शिवानी यांना मात्र उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
अखेर तिढा सुटला, पण वडेट्टीवारांची भूमिका काय?
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी वडेट्टीवार उमेदवारीसाठी मैदानात होत्या. पण, प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता मुलीला उमेदवारी नाकारल्यानंतर विजय वडेट्टीवारांची भूमिका काय असणार आहे. प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार वडेट्टीवारांकडून केला जाणार का?, शिवानी वडेट्टीवार देखील पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रस्त्यावर येणार का? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे आता विजय वडेट्टीवारांची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर
रविवारी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हे 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..