घड्याळ चिन्हबाबत अजित पवार गटांची जाहिरात , शरद पवार गटांच्या आक्षेप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करत राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायप्रविष्ट असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे’ अशी अजित पवार गटाने जाहिरात प्रकाशित केली आहे.
मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने या जाहिरातीला आक्षेप घेत, हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचा दावा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना वृत्तपत्रांव्दारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे आदेश दिले असून घड्याळ चिन्ह प्रकाशित करताना सर्वत्र इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीनही भाषेत महत्त्वाची नोंद नमूद करण्यास सांगितले आहे. अजित पवार यांना केवळ खटल्याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टर्स, बॅनर्स या प्रत्येक ठिकाणी घड्याळ चिन्हाचे वापर करताना ‘चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे’, असे नमूद करणे अनिवार्य असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सोयीस्कररित्या स्वार्थ…
या जाहिरातींव्दारे जनतेची दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचे काम करण्यात आल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे. जनतेने अजित पवार गटाचा हा जाहिरातीमागील सोयीस्कररित्या साधलेला स्वार्थ लक्षात घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..