अजित दादांचं ठरलं…! ; ” या” तारखेला होणार राष्ट्रवादीच्या उमेदवार जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून, आता सर्वच उमेदवारांच्या नावाची यादी देखील जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
अशात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही. तसेच, काही जागांवर अजूनही चर्चा सुरूच असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून महायुतीमधील पक्षात जागावाटपाच्या मुद्यावरून बैठकांवर बैठका सुरु आहे. स्थानिक पातळीवर तोडगा निघत नसल्याने तीनही पक्षातील नेत्यांनी दिल्लीवारी करत थेट दिल्लीत देखील बैठका घेतल्या. मात्र, अजूनही यावर पूर्णपणे कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. मात्र, पुढील दोन दिवसांत महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता असून, त्यानुसार 28 मार्च रोजी अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
राष्ट्रवादीला 5 पेक्षा अधिक जागा मिळणार?
महायुतीत जागावाटपाच्या निर्णय अंतिम टप्प्यात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने 9 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपकडून एवढ्या जागा देण्याची शक्यता कमी आहे. काही जागांवर राष्ट्रवादीने दावा केला असून, त्या जागा भाजप आणि शिवसेनेला देखील हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अंतिम निर्णयाकडे तीनही पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागून आहे.
शिवाजीराव आढळराव उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार…
महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार असून, उद्या संध्याकाळी चार वाजता मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर ते महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून शिरूर लोकसभेसाठी उभे राहताना पाहायला मिळतील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..