सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरणार आहे. चंद्रपुरात काँग्रेसकडून उमेदवारी रविवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी भाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात प्रतिभा धानोरकर रिंगणात

पाचव्या यादीमध्ये तीन उमेदवारांना तिकीट
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. पाचव्या यादीमध्ये तीन उमेदवारांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एक आणि राजस्थानमधील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पाचव्या यादीमध्ये चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे.
जयपूर आणि दौसामधील काँग्रेस उमेदवार जाहीर
यासोबतच, राजस्थानमध्ये जयपूर लोकसभा मतदारसंघात प्रताप सिंह खाचरियावास यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच दौसा मतदारसंघातून मुरारी लाल मीना यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस उमेदवारांची पाचवी यादी
महाराष्ट्र – चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर
राजस्थान – जयपूर – प्रताप सिंह खाचरियावास
राजस्थान – दौसा – मुरारी लाल मीना

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..