सोलापूरचा भाजपचा उमेदवार ठरला , प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते मध्ये लढत होणार..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारतीय जनता पक्षाने आज (दि.24) लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे.
सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत. राम सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत राम सातपुते?
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला.
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या 2590 मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पाहोचले. विधिमंडळात आक्रमक भाषण, आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात. पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेचा मुकाबला करतील.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..