शिंदेंचा कॉंग्रेसला मोठा दणका ; काँग्रेस चे आमदार राजू पारवे यांच्या शिंदे गटात प्रवेश ; रामटेक मधून उमेदवारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस आमदार राजू पारवे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे लोकसभा निवडणुकीसाठी रामटेकमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आमदार राजू पारवेंचा शिंदे गटात प्रवेश
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , कृपाल तुमाने आणि आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत शिंदे गटात छोटेखानी पक्षप्रवेश झाला आहे’, अशी माहिती राजू पारवे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राजू पारवे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार. त्यांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचं सांगितलं आहे.
राजू पारवे धनुष्यबाण चिन्हांवर निवडणूक लढणार?
राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात प्रवेश करताच राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे उमेदवारीसाठी राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच?
रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. भाजपला रामटेकची जागा हवी आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही, असं सांगितलं जात असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून रामटकेची उमेदवारी मिळाल्याचा दावा राजू पारवे यांनी केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..