समज देवून ही बंडखोरी कायम , मुख्यमंत्री शिवसेना नेत्यावर कडक कारवाई करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप झालं नसलं तरी बंडखोरीने डोकं वर काढलं आहे. बारामतीमधून विजय शिवतारे निवडून लढवण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही विजय शिवतारेंचं बंड शांत होत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुती धर्म आणि पक्ष शिस्त पाळत नसल्यामुळे विजय शिवतारेंवर कारवाई होणार आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत. काल रात्रीच विजय शिवतारेंच्या आजच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती मिळाली होती.
विजय शिवतारे यांची अनेकदा समजूत काढण्यात आली होती. शिवसेनेचे अनेक मंत्रीही विजय शिवतारे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. शिवतारेंच्या भूमिकेमुले राज्यात इतर ठिकाणीही महायुतीत कटुता येऊ शकते, त्यामुळे विजय शिवतारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. महायुती धर्म न पाळल्यास निवडणुकांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं, अशी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम
‘संपूर्ण राज्यातून मला फोन येत आहेत. राष्ट्रवादी संभ्रम पसरवत आहे. मी झुंडशाही आणि घराणेशाहीविरोधात लढणार. राज्यात राजकीय चिखल झाला आहे. मी नवीन पर्याय, नवीन पर्व आणि पवार पर्व संपवण्यासाठी लढत आहे. आम्ही तुम्हाला मतदान का करायचं? पवारांनी आमच्यावर अन्याय केला. ही लढाई जिंकण्यासाठी लढत आहोत. पवाररुपी हुकूमशाही संपवण्यासाठी हे माझं धर्मयुद्ध आहे’, अशी टीका विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबावर केली.
‘जनतेचा आशिर्वाद आहे, छुपे आशिर्वाद असतील. सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहेत. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. अजित पवारांचं राजकारण स्वार्थाचं आहे. म्हणून आम्ही महाविकासआघाडीतून बाहेर पडलो. 1 तारखेला सभा घेणार. 50 ते 60 हजार लोकांची सभा घेऊ. सगळ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहे. मी आजही शिवसैनिक आहे, एकनाथ शिंदे आदरस्थानी आहे. मी नक्की जिंकणारच,’ असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे.
12 तारखेला फॉर्म भरणार
’12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरणार आहे. रोड शो करणार आहे. 4 जूनला जनशक्ती आणि भावना काय असते हे दाखवू. राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात दहशतवाद पेरला आहे. सत्तेचा गैरवापर केला आहे विजय शिवतारे यांच्या माणसांना त्रास दिला. संग्राम थोटपे यांचा कारखाना बंद पाडला. या दहशतीचा उगम शरद पवारांनी केला आहे. एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसरा राक्षस नको उभा करायला. हा विंचू आधी आम्हाला डसला आणि आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे’, अशी जोरदार टीका विजय शिवतारेंनी अजित पवारांवर केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..