अजित पवार गटांकडून पक्ष चिन्हाबाबत निवेदन जाहीर ; शरद पवार गटाचा आक्षेप ; प्रकरण काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हा वापरण्याची परवाणगी दिली मात्र यासाठी अट घातली होती. त्यानुसार अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात संघर्ष तिव्र झाला आहे.
निवेदनात काय म्हटलं?
निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह दिलं आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. अंतिम निकालाच्या अधिन राहून सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निवेदनावर आक्षेप घेतला आहे. अजित पवार गटाने दिलेली ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना अतिशय स्पष्टपणे निर्णय घेतला. हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असून त्याचा अवमान आहे, असे आव्हाड म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शरद पवार यांना तुतारी वाजवणाऱ्या माणूस निवडणूक चिन्ह म्हणून वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार गटाने अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलेले ‘घड्याळ’ निवडणूक चिन्ह वापरण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावत अजित पवार गटाला घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली.
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असून त्याचा वापर निर्णयाच्या अधीन असेल, अशी जाहीर नोटीस इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणुकीशी संबंधित सर्व दृकश्राव्य जाहिराती आणि बॅनर्स आणि पोस्टर्स इत्यादींमध्ये याचा उल्लेख करण्याची सूचना दिली.
यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानला होता. निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह (घड्याळ) वापरू शकतो, असे निवडणूक आयोगाने त्यावेळी सांगितले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..