मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली मध्ये बैठक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रामगव्हाण रस्त्यावरील मैदानावर रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पुढील दिशा कोणती ठरवतात, हे बैठकीत जाहीर करणार आहेत. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. ‘सगेसोयरे’बाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला नाही. कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाही, शिवाय आणखी खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, अशी टीका ते वारंवार करत आहेत. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे.
‘अंतरवाली सराटी येथील रविवारच्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आरक्षणात काय मिळाले, काय नाही मिळाले आणि पुढे काय करायचे, यावर चर्चा होईल. मराठा समाज आपली भूमिका येथे मांडणार आहे,’ असे जरांगे यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..