पुन्हा दिल्ली दरबारात महायुती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशात लोकसभा निवडणूकीचे रण पेटले असून सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे मविआ आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे.
महायुतीतील जागावाटपावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. जागावाटपाबाबत अद्याप महायुतीत खलबते सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा जागावाटपासाठी दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा होणार आहे. यात महायुतीच्या घटकपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी बैठक होईल. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा केली करून जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपाच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत.
शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या जागांच्या अनुषंगाने आज अंतिम चर्चा पार पडणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर महायुतीचे उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना जागावाटपाबाबत प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आमचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे, 20 टक्के काम लवकरच पूर्ण करु. बैठकीमध्ये याचा निर्णय होईल. तीन पक्षांचे अंतिम जागावाटप बाकी आहे. कोल्हापूर छत्रपती सन्मान, मग साताऱ्यातील उदयनराजे उमेदवारी दिली तर तीही बिनविरोध होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. उदयनराजे भोसले यांची अमित शहांसोबत भेट होईल, ते त्यांचे मत मांडतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची आज किंवा उद्या बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….