राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आणखी ९ उमेदवार झाले “फिक्स”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवार यांनी सरप्राईज नावं दिली आहेत.
महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी त्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरु आहे. याशिवाय पहिल्या 9 जणांची संभाव्य यादी परत हाती लागली आहे. यामध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे. रावेर आणि दिंडोरी जागा शरद पवारांकडे आली आहे.
जागा आणि संभाव्य उमेदवार
बारामती-सुप्रिया सुळे
माढा-महादेव जानकर(रासप)
सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
शिरुर-अमोल कोल्हे
नगर दक्षिण-निलेश लंके
बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
वर्धा-अमर काळे
शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा
दुसरीकडे, अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. असे असतानाच शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आगामी काळात अजित पवार गटातील बरेच नेते परत येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर ही इन्कमिंग आणखी वाढेल, असे पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर वेगेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. भविष्यात अजित पवार यांच्या गटातील कोणकोणते नेते शरद पवार यांच्या गटात जाणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
माढ्यात निकराची लढाई होणार?
माढ्यात शरद पवार यांनी सर्वप्रथम महादेवर जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी साद घालताना जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. आता थेट उमेदवारी जाहीर करून मोठी खेळी केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली, असली तरी सुरु असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. निंबाळकरांच्या उमेदवारी बदलीची मागणी सुद्धा होऊ लागली आहे. निंबाळकरांविरोधात रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाने उघड विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….