नांदेड मतदार संघातून काँग्रेस कडून वसंत चव्हाण रिंगणात उतरणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- लोकसभेचा नांदेड मतदारसंघ महाविकास आघाडीत कॉँग्रेसकडे आला असून माजी आमदार वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कॉँग्रेसतर्फे हे एकमेव नाव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले होते.
त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता कॉँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर आमनेसामने असतील. वंचित बहुजन आघाडी, ‘एमआयएम’ आणि अन्य पक्ष काय निर्णय घेतात, कोणता उमेदवार जाहीर करतात, यावर लढतीचे पुढील चित्र अवलंबून असेल.
वसंत चव्हाण यांचे वडील बळवंतराव चव्हाण हेदेखील आमदार होते. सुरवातीला ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत होते. शरद पवार यांच्यामुळे वसंत चव्हाण यांची २००२ मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभेच्या नायगाव मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. ते विजयी झाले.
त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांच्यासोबत ते काँग्रेसमध्ये गेले आणि २०१४ मध्ये त्यांनी कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळवत पुन्हा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्षपदही भूषविले. सत्तरवर्षीय वसंतराव चव्हाण हे १९७८ ते २००२ पर्यंत सलग २४ वर्षे नायगावचे सरपंच होते. जिल्हा परिषदेचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नायगाव बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
असे नातेसंबंध आणि सगेसोयरे
माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात नातेसंबंध आहेत. त्याचबरोबर दोघांचेही नायगाव, देगलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी सगेसोयरे आहेत. चिखलीकर हे नायगाव तालुक्याचे जावई तर वसंतराव भूमिपुत्र आहेत.

गव्हर्मेंट जॉबमधील मराठी कर्मचाऱ्यांना हिंदीच्या परीक्षेची सक्ती..? राज्य सरकारच्या पत्रकाने खळबळ….
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका….
दहावीचा निकाल या दिवशी लागणार ; संभाव्य तारीख आली समोर….
शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार, शिक्षणसेवकांच्या आशा पल्लवित….
काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….