त्या’ वक्तव्याने वाढली तणातणी अन् राहुल गांधींची उद्धव ठाकरेंना फोनाफोनी!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
देशातील सर्वांत अधिक कोरोना संकट राज्यावर गडद होत चालले असताना राजकारणालाही कमालीची धार चढली आहे. त्यामुळे राज्यात एका पाठोपाठ एक राजभवन भेटी आणि आणि त्यानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल उद्विग्नता व्यक्त केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केली. राज्यात सरकारला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.
.महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे; पण मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली उद्विग्नता व्यक्त केली. सरकार चालविण्यात आणि सरकारला पाठिंबा देण्यात फरक असतो असे सांगून ते म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला सहकार्य करण्याची गरज आहे. चारही टप्प्यांतील लॉकडाऊन अपयशी ठरले असून, केंद्रातील मोदी सरकारचा प्लॅन बी काय आहे, असा सवाल गांधी यांनी केला. गरजूंना साडेसात हजार रुपये देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..