हिजडा’ शब्द भोवला! निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथीय आक्रमक ; गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निलेश राणे यांच्याविरुद्ध तृतीयपंथी आक्रमक झाले आहेत. उपहासात्मक ‘हिजडा’ शब्दप्रयोग केल्याप्रकरणी फैजपूर (ता. यावल, जि.जळगाव) अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.तृतीयपंथी स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे. त्यांच्या संघर्षाविषयी कुठलीही जाणीव नसलेले लोकप्रतिनिधी निलेश नारायण राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले.हिजडा’ असा शब्दप्रयोग करणे अशोभनीय असल्याचं शमिभा पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले आमदार रोहित पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात चालत असलेल्या सोशल मीडियावरील राजकीय वाक्युद्धात निलेश राणे यांनी 19 मे रोजी सायंकाळी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ‘हिजडा’ शब्दप्रयोग उपहासात्मक पद्धतीने केला होता. यामुळे तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.
‘कोणीतरी ‘हिजडा’ राज्यमंत्री आहे. तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले समोर आले की पिवळी होते. साल्यांची जागा सांग तनपुरे येतो मी.’, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होते.
नालसा प्राधिकरणाच्या 2014 च्या दीर्घ अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारे यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख ‘हिजडा’ असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून प्रशासकिय शब्द ‘तृतीयपंथी’ अशी लिंग मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारा व सामाजिक कृती पोहोचवणे गुन्हा आहे. तरी निलेश नारायण राणे यांनी भादंवि Defamation Act 499 नुसार मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे, याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता’, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….