राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द; कारणही आलं समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोरील शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निर्णय लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. शिवसेनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी आज (गुरुवार) होणार होती.
मात्र, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी रद्द झाल्याची माहिती आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे आज होणारी सुनावणी रद्द करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वेळेअभावी सुनावणीचे वेळापत्रक मात्र आजच तयार होणार असल्याचीही माहिती आहे. आज दिवसअखेर पर्यंत सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मान्यतेनंतरच वेळापत्रकानुसार सुनावणी अपेक्षित आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीची सुनावणी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान आहे, त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होणार आहे.
डिसेंबर महिन्यातल्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पुर्ण झाली आहे. सुरूवातीला कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत याप्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते, यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी 3 आठवड्यांची मुदत मागितली होती, त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत निकाल द्यायला सांगितलं आहे. हा निकाल यायच्याआधीच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होणार होती. मात्र, आज ही सुनावणी रद्द झाल्यानंतर आता पुढील सुनावणी कोणत्या दिवशी होणार हे अस्पष्ट आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….