दूधाला 5 रुपये अनुदान ते शिवडी न्हावाशेवा लिंक रोडला 250 रुपये टोल ; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल निश्चित करण्यात आलाय. त्याशिवाय दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
त्याशिवाय इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आलाय.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय ( संक्षिप्त )
नोव्हें २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा
( वित्त विभाग)
अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी 250 रुपये
( नगरविकास विभाग )
दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान.
( दुग्धव्यवसाय विकास)
विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार
( जलसंपदा विभाग)
मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता.
( वित्त विभाग)
पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान . ४०० उद्योगांना फायदा
( वस्त्रोद्योग)
रेशीम उद्योगाच्या विकासासाठी ” सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ
( वस्त्रोद्योग विभाग)
द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार
( उद्योग विभाग)
नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता
( परिवहन विभाग)
सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला
( सहकार विभाग)
गिरीश महाजन काय म्हणाले ?
शिवडी न्हावाशेवा लिंकवर 250 रूपये टोल ठरवण्यात आलाय. किफायतशीर दर आहे . वेळ व इंधनात बचत होणाराय. 23 तारखेला या सेतूचे उद्धाटन पंतप्रधान करणार आहेत. जुन्या पेन्शनसंदर्भात नागपूरमध्ये बैठक झाली होती. त्यांच्या मागण्या समोर आहेत. त्यांना अपेक्षित आहे ते मिळणाराय. चार हजार की किती ते आता टेक्निकली माहिती नाही. पाच रूपये प्रति लिटर अनुदान दूध उत्पादकांना दिले जाणाराय, असे गिरीश महाजन म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….