राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेवर ३१ जानेवारीपूर्वी येणार निकाल ; गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात अपात्रतेची कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी यावर निकाल द्यावा लागणार आहे.
त्यानुसार, येत्या गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकालही कुठल्याही क्षणी येऊ शकतो.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रताप्रकरणी गुरुवारी सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात राहुल नार्वेकर यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, सध्या राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडं सुनावणी सुरु आहे. याचा निकालही कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तर दुसरीकडं विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी सुरु होत आहे. याचाही निकाल ३१ जानेवारीपूर्वी विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..