आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा मोठा कट ; CBI ने नोटीस बजावताच उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू :- ‘माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत.’
आपणास राजकीयदृष्ट्या संपवण्याचे मोठे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.
बेकायदेशीर मिळकत प्रकरणात सीबीआयने (CBI) त्यांना नोटीस बजावल्याबद्दल पत्रकारांशी ते संवाद साधत होते.
ते म्हणाले, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची परवानगी मागे घेतल्यानंतरही ही नोटीस बजावली आहे. माझा छळ करून आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे सुरु आहे. यात काही मोठे लोक आहेत. त्यांचे मोठे षड्यंत्र सुरू आहे, असेही ते म्हणाले.
सरकारने आधीच खटला मागे घेतला आहे. मात्र, ते कोणत्या कारणाने नोटीस दिली माहीत नाही. सीबीआय प्रथम त्यांचा तपास फर्म स्तरावर पूर्ण करेल आणि नंतर ते वैयक्तिकरित्या माझ्याकडे येतील.
आपल्याला तुरुंगात टाकण्यात त्यांना रस असेल तर तुरुंगात टाकू द्या, असा संताप त्यांनी व्यक्त केला. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे कशाचीही भीती नाही. आपल्याला न्याय मिळेल. सरकारने हे प्रकरण लोकायुक्तांना आधीच दिले आहे. लोकायुक्त पुढील चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..