संकल्प रथयात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची…? गावकऱ्यांमध्ये रोष, रथयात्रा परतवून लावली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मारेगाव (यवतमाळ) :- केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी गावात आलेल्या संकल्प रथयात्रेला गावकऱ्यांनी परतवून लावले. मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथे शनिवारी हा प्रकार घडला.
ही रथयात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची, असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
जिल्ह्यात दररोज शेतकरी, शेतमजूर आत्महत्या करीत आहेत. अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नाही. शेतमालाला हमीभाव नाही. बेरोजगारी, महागाईने जनता त्रस्त आहे. तरीही शासन सर्वत्र आनंदीआनंद असल्याचे भासवत ‘मोदी सरकार’ असे अंकित केलेला संकल्प रथ गावागावत फिरवत आहे. सरकारच्या विकासकामांची माहिती रथाच्या माध्यमातून जनतेला देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. शनिवारी हा रथ पिसगाव व किन्हाळा येथे दाखल होताच नागरिकांनी संकल्परथ आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने अधिकाऱ्यांनी गावातून रथ परत घेऊन जाणे पसंत केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..