“राम मंदिर उद्घाटन राजकीय कार्यक्रम होऊ नये”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शनिवारी ( ३० डिसेंबर ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं.
तसेच, राम मंदिर सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला होता. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा राजकीय कार्यक्रम होऊ शकत नाही. असं बोलणाऱ्यांना राम भक्त उत्तर देतील. आता घरी बसलेले आहेत. राम भक्त कायमचे घरी बसवतील. म्हणून विचार करून विधानं करावीत. अयोध्येतील राम मंदिर हा करोडो भक्तांच्या अस्मितेचा विषय आहे.”
“मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली”
“आधी काहीजण ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकीन तारीख नहीं बताएंगे’ असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायचे. मात्र, मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आहे. आरोप करणाऱ्यांची अवस्था ‘मुंह में राम बगल में छुरी’ अशी आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही. अयोध्येत राम मंदिर होणं, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी शिवसेनेनं मोठा संघर्ष केला आहे. राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्यानं बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं असून अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. त्यामुळे राम मंदिर उद्घाटन सोहळा राजकीय कार्यक्रम होऊ नये,” अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..