फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत ‘गो बॅक’ची घोषणाबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- येथील आ.नारायण कुचे यांनी आयोजित केलेल्या श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी भेट दिली.
हा कार्यक्रम आटोपून जालन्याकडे परत जात असताना एक मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आला. काळा झेंडा दाखवून ‘देवेंद्र फडणवीस, गो बॅक’ अशा घोषणा यावेळी या आंदोलकाने दिल्या. त्याला बंदोबस्तावरील महिला पोलिसाने ताब्यात घेतले.
दरम्यान, बदनापुर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येत्या २२ तारखेला राम मंदिराच उद्घाटन होणार आहे.संपूर्ण भारत पुन्हा एकदा राममय होतोय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आ. नारायण कुचे यांचे मनापासून अभिनंदन करेल. त्यांनी भव्य रामकथा कार्यक्रम आयोजित केला. राम कथा ज्यांनी ऐकली तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुधार करू शकतो. जीवनात तरला जाऊ शकतो.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष अश्विनी पवार, शहराध्यक्ष सत्यनारायण गेलडा, नगरसेवक पद्माकर जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, विलास जऱ्हाड, जगन्नाथ बारगजे, अनिल कोलते, भगवान बारगजे, भगवान म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….