डॉ. मोहम्मद नदीम यांना बंधू शोक ; मोहम्मद जावेद यांचे मुंबईत अपघाती निधन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद/मुंबई :- काँग्रेस नेते डॉ. मोहम्मद नदीम यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्त असिस्टंट पोलीस कमिशनर मोहम्मद जावेद यांचे दि. 26 रोजी ,मंगळवारी रात्री अकरा वाजता अपघाती निधन झाले. माझगांव मुंबई येथे वास्तव्यास असलेले मोहम्मद जावेद हे आपल्या नित्यक्रमाप्रमाणे रात्री फिरायला गेले होते. फिरत असतांनाच भरधाव टॅक्सीने त्यांना धडक दिली. लगेच त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोहम्मद जावेद हे पोलीस खात्यातील अत्यंत धडाडीचे आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात. राज्यात गाजलेल्या तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या तपासातही त्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. अतिशय मृदू स्वभावाचे परंतु कणखर असलेले मोहम्मद जावेद यांचे मूळ गाव पुसद तालुक्यातील बोरी ईजारा असून ते काँग्रेस नेते डॉ. मोहम्मद नदीम यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू समयी ते ७२ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली,मुलगा आर्थोपेडीक सर्जन डॉ.मुदस्सीर, तसेच आई, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मुंबईतील नारियल बाडी कब्रस्तानात करण्यात आला.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….