पहिली ते बारावीसाठी १२ शैक्षणिक चॅनल्स : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वावलंबी भारत अभियानांतर्गत रविवारी शेवटची पत्रकार परिषद घेतली आणि पॅकेजमधील 5 व्या ब्ल्यू प्रिंटबद्दलचा तपशील जाहीर केला. खरे तर पॅकेज 20 लाख कोटी रुपयांवर गेलेले आहे. ते एकूण 20 लाख 97 हजार 53 कोटींचे झाले आहे. अखेरच्या या पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी शिक्षण, मनरेगा, आरोग्य, व्यापार, कंपनी कायदा, इझ ऑफ डुईंग बिझनेस, सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय आणि राज्य सरकारांशी संबंधित 8 घोषणा केल्या. पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गासाठी एक स्वतंत्र चॅनल सुरू केले जाईल. क्यूआर कोडच्या माध्यमातून ई-पुस्तकांचे वाचन करता येईल.सरकारने याच पॅकेजमध्ये पंतप्रधानांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी जाहीर केलेल्या 1 लाख 92 हजार 800 कोटी रुपये खर्चाच्या घोषणाही समाविष्ट केल्या आहेत. 22 मार्चपासून करात दिलेल्या सवलतींमुळे महसुलामध्ये होणारे 7,800 कोटी रुपये नुकसानही यातच सामावून घेण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने या क्षणापर्यंत ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत, त्यापोटीचे 8 लाख कोटी रुपयेही याच पॅकेजचा एक भाग आहेत. सरकारने 56 दिवसांत 20.97 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. पैकी 11 लाख कोटी रुपयांबाबतच्या घोषणा गेल्या 5 दिवसांत झाल्या.
धोरणात्मक क्षेत्रे सोडून इतर सार्वजनिक क्षेत्रे आता खासगी क्षेत्रासाठी खुली करण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे एखाद्या कंपनीला तोटा झाला तर प्रत्यक्ष दिवाळखोरीनंतर पुढच्या वर्षापर्यंत कंपनीविरुद्ध सरकारकडून कुठलीही कारवाई होणार नाही.
2 तासांत 8 घोषणा
1) 1.01 हजार कोटी रुपये मनरेगावर खर्च होतील
2) नवी रुग्णालये उभारणार, गटस्तरावर प्रयोगशाळा
4) कोरोनामुळे नुकसान झाल्यास दिवाळखोरी जाहीर करणार नाही
5) कंपनी अॅक्ट सुलभ केला जाईल
6) कॉर्पोरेटस्साठी इझ ऑफ डुईंग बिझनेस
7) पीएसयू पॉलिसी
8) राज्यांना केंद्राकडून जास्त रक्कम मिळेल